असाध्य ते साध्य करण्या, सायास करणे अभ्यास

या शब्दात संत तुकाराम महाराज यांनी अभ्यासाचे महत्त्व प्रतिपादले आहे. माणसाला कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम आणि दृढ संकल्प याला पर्याय नाही. डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटलेच आहे “शोर्टकट हा जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग नाही”, कारण शोर्टकटमुळे मिळालेले यश हे चिरकाल टिकणारे नसते.पण माणसामध्ये जिद्द असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करुण जीवनात यशस्वी होऊ शकतो. यासाठी आपल्याला लो. टिळकांच एक विधान खूप प्रेरणादायी आहे. एकदा लो.टिळक एका केसमध्ये तो खटला हरले होते तेव्हा या सिहाने डरकाळी फोडली की, “माझ्यावर आभाळ कोसळे तरी मी त्याच्यावर पाय ठेऊन उभा राहील.” म्हणजेच माणसाने अपयश आल्यावर खचून नजाता पुन्हा मोठया जोमाने प्रयत्न करुण त्या अपयशावर विजय मिळवला पाहिजे.

 

ऊर्दूमंध्ये खूप छान एक वाक्य आहे, ते म्हणजे “किस्मत लिखनेसे पहले खुदा बंदेसे पूछे, बता तेरी वजह क्या है”|

 

म्हणजेच माणसाने स्वतःला परिश्रम करुण येवढे परीपूर्ण केले पाहिजे की, दातासुद्धा त्याच नशीब लिहिताना विचारात पडला पाहिजे. माणसाच्या जीवनात संधी ह्या चालून येत नसतात तर त्या माणसाने स्वतः मेहनत करुण निर्माण करायच्या असतात आणि हे तेव्हाच साध्य होते जेव्हा आपण कठोर परिश्रम करू. दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवल्यानंतर एका पत्रकाराने विस्टन चर्चिलला प्रश्न विचारला की, जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र कोणता, तेव्हा चर्चिल त्यांना म्हणाले जीवनात यशस्वी होण्याचा असा कोणताही कानमंत्र नाही पण “ज्या माणसाची कामावर श्रद्धा, जिद्द, आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल ती व्यक्ती जीवनात यशस्वी होते”. म्हणजेच काय तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही .

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना चोवीस तासापैकी अठरा अठरा तास अभ्यास करत असत. या विद्येच्या उपासकाने विद्येची कठोर ज्ञानसाधना केली त्यामुळे यश आणि कीर्ती मिळाली. माणूस शिक्षण घेत असतांना थोड्या थोड्या गोष्टीचा बाहू करुण आपल्या ध्येयापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. पण बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन हे समस्यांनीच भरलेले होते. पण त्यांनी त्या समस्यांना आपल्या ध्येयातील आडकाठी बनू नदेता त्यावर मात करुण आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रम केले. त्यांच्या जीवनात कोणतीही परिस्थिती अनुकूल नसतांना केवळ कठोर परिश्रमाच्या बळावर जर ते महामानव बनू शकतात तर आपण त्यांच्या जीवना पासून प्रेरणा घेऊन जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.

 

विद्यार्थी जीवन खूप सुंदर असतं. त्याला आपण योग्य सवय आणि शिस्त लावली तर त्याला आणखी सुंदर बनवता येते. जगामंध्ये ज्या मोठ मोठया व्यक्ती होऊन गेल्यात त्यांनी विद्यार्थी दशेपासून आपल्यात शिस्त आणि कठोर परिश्रमाची सवय लाऊन घेतली होती. कारण अस म्हणतात की, “एक वेळ नशीब कमी पडलं तर चालेल, पण मेहनत कमी पडता कामा नये”. कारण आपल्या मेहनतीवरच जीवनाच्या यश अपयशाच पारड हालत असते. पण ते आपण ठरवावं लागते की, मेहनत करुण ते आपल्या बाजूला ठेवायचं की मेहनत नकरून ते दुसऱ्या बाजूला ठेवायचं.

 

विद्यार्थ्याला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यासा शिवाय पर्याय नसतो. कारण विद्यार्थ्याने केलेला अभ्यास हेच विध्यार्थ्याचे भविष्य घडवत असते. त्यामुळे आपल भविष्य कस असाव हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. विद्यार्थी दशेत इतर गोष्टीचा आनंद घेण्यासोबतच अभ्यास करणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते कारण तोच अभ्यास आपल्या जीवनाचा पाया घालत असते. त्यामुळे विद्यार्थ्याने अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करुण आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार झाले पाहिजे.

 
– Mr.Satish Bhagat