Marathi Wangmay Mandal

Gurupurnima 2021
Dr Ambedkar Jayanti Celebration Report 2021
Marathi Wangmay Mandal 2020-21
Guru Purnima 2020-21
Marathi Wangmay Mandal 2019-20
Marathi Wangmay Mandal 2018-19
Marathi Wangmay Mandal 2017-18
Marathi Wangmay Mandal 2016-17
Marathi Wangmay Mandal 2015-16
Marathi Wangmay Mandal 2014-15

Marathi Wangmay Mandal

सध्याच्या महाविद्यालांमध्ये बहुभाषिक मुलं आणि शिक्षणात  इंग्रजीचा प्रभाव यामुळे महाराष्ट्रात मराठीचा वापर कमी होत आहे.  म्हणून बऱ्याच महाविद्यालयामध्ये मराठी वाङ्मय मंडळ स्थापन केले जाते.  आपल्याही महाविद्यालयात असं मराठी वाङ्मय मंडळ गेल्या बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे.  मराठी भाषा विषय म्हणून शिकवली जात नसूनहीे मंडळ आपले अस्तित्व टिकवून आहे.

या मंडळाची मुख्य उद्दिष्ट  आहेत –

१. मराठी संस्कृतीची जपणूक करणे,

२. मराठी भाषेतील दर्जेदार वाङ्मयाची आणि त्या साहित्यिकांची ओळख करून देणे,

३.  त्यानिमित्त वेगवेगळे उपक्रम, व्याख्याने, स्पर्धा  वगैरे आयोजित  करणे

हे मंडळ याच उद्देशाने रिमझिम हा वार्षिक कार्यक्रम आयोजित करते.  यात मुले उतारा- वाचन, काव्य-वाचन, गाणी, नृत्य, अभिनय ई. प्रकार मोठया उत्साहात सादर करतात. मराठी मंडळा तर्फे दरवर्षी अजून एक राबवला जाणारा उपक्रम म्हणजे मराठी भाषा दिन, जो दि २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. परीक्षेच्या काळात येणाऱ्या या दिवशी मुलांचा सहभाग कमी असतो.  म्हणून महाविद्यालयातील शिक्षकच हा कार्यक्रम सादर करतात. त्यांनी आत्तापर्यंत कै वि स खांडेकर, कै वि वा शिरवाडकर, कै मंगेश पाडगावकर     ई साहित्यिकांना त्यांचे साहित्य सादर करून मानवंदना दिली आहे.

या वर्षी मंडळाने आतापर्यंत खालील कार्यक्रम आयोजित केले आहेत –
१. काव्यवाचन स्पर्धा
२. रिमझिम

या महाविद्यालयातील व्यवस्थापन समिती आणि  मुख्याध्यापिका यांच्या पाठिंब्यामुळे आणि मुलांच्या भरघोस प्रतिसादामुळे सर्व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडले जातात.

छायाचित्र संग्रह —

मंडळाचे सभासद –

  1. डॉ. प्रसन्न रानडे (अध्यक्ष)
  2. डॉ. परिणीता मदन.
  3. डॉ. सीमा  बोरगावे.
  4. डॉ. श्वेता  पाटील.
  5. श्री. सचिन  भांडारकर.
  6. श्री. कुणालकुमार शेलार
  7. श्री. कमलाकर  भोपटकर.
  8. डॉ. वैष्णवी  बागुल.

View more